काम्यूने ‘निरर्थकता’ आणि ‘अस्तित्ववाद’ या आपल्या तात्त्विक विचारधारेचा उपयोग “दि आऊटसायडर” या कादंबरीत उत्तमरित्या केला आहे!
सगळ्यापासून दुरावलेला, समाजासाठी अपरिचित असणारा नायक ‘त्रयस्थ’ असणार, हे स्वाभाविक आहे. काम्यूने तो ‘जसा’ आहे, ‘तसा’ वाचकांसमोर सादर केला आहे. काम्यू नायक मेर्सोकडे एक ‘त्रयस्थ’ म्हणून पाहतो. मेर्सो खरंच कसा आहे, हे ठरवण्याचे दायित्व वाचकांचे आहे. काम्यू म्हणाला होता : ‘meursqult is the only christ we deserve’.......